देशभरातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सात राज्यांतील एकूण ५९ मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीचे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यापार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल चुकीच्या मार्गाने पुढे जात असतील तर अशा लोकांना जनतेनेच धडा शिकवला पाहिजे केवळ केेजरीवालच नाही तर कुणीही असो. जोपर्यंत अशा लोकांना जनता धडा शिकवणार नाही तोपर्यंतयांना अद्दल घडणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया हजारे यांनी दिली आहे.