Skip to content Skip to footer

एम.आय.एम नगरसेवकाचा चाकूचा धाक दाखवून केला महिलेचा विनयभंग……

संभाजी नगर मधील एम.आय.एमच्या निलंबित नगरसेवकाने ओळखीचा गैरफायदा आणि पिस्तूलाचा धाक दाखवून एम या एमच्याच एका महिला नगरसेविकेवर खंडाळा येथील वॉटर पार्कमध्ये विनयभंग केला तसेच संभाजी नगर येथील कृष्णासागर रेसिडेन्सी बारामती, औरंगाबाद शहरात, शरणापूर फाटा येथील एका लॉजवर आणि हर्सूल येथे एका घरामध्ये संबंधित महिलेला गुंगीचे औषध देऊ बलात्कार केला. येथे ठिकठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळो-वेळी बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीचा भाऊ व मेव्हुण्यानेही पीडित महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून याप्रकरणी तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आरोपी एमआयएममधून निलंबित करण्यात आलेला नगरसेवक आहे. आरोपी आणि पीडित महिला २०१५ साली संभाजी नगर महानगर पालिकेत नगरसेविक म्हणून एकाच पक्षातून निवडून आले होते. निलबिंत नगरसेवक मतीन रशीद सैय्यदसह अन्य दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मतीनसह मेहुणा हामेद सिद्धकी आणि भाऊ मोहसीन रशीद सैय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त एमआयएममधून निलंबित नगरसेवक मतीन रशीद सैय्यद याची पक्षातून अगोदरच हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्याच्यावर संभाजी नगर येथे बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, निलंबित नगरसेवक मतीन आणि फिर्यादी महिला हे दोघे ओळखीचे आहेत. २७ वर्षीय पीडित महिलेला मतीनने तुमची आई आजारी आहे असे सांगून पीडित महिलेसह दोन मुलांना मोटारीत बसवून खंडाळा येथील वॉटर पार्क येथे घेऊन गेला. अगोदर पिस्तूलाचा धाक दाखवत विनयभंग केला, त्यानंतर संभाजी नजर येथील कृष्णासागर रेसिडेन्सी बारामती, शरणापूर फाटा येथील एका लॉजवर आणि हर्सूल येथे एका घरामध्ये संबंधित महिलेला गुंगीचे औषध देऊ बलात्कार केला. तसेच महिलेच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. दरम्यान, मेहुणा हामेद आणि भाऊ मोहसीन यांनी पीडित महिलेचा विनयभंग केल्याचं देखील फिर्यादीद म्हटलं आहे

Leave a comment

0.0/5