Skip to content Skip to footer

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते दुष्काळ दौऱ्यावर रवाना…….

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नंतर मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी दुष्काळग्रस्त भागातील जिल्ह्याचा दौरा केला आहे. कन्नड तालुक्यातील अनेक दुष्काळ गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांची होरपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते दुष्काळ दौऱ्यावर आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातील अनेक गावात भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोणी खुर्द, खंडाळा, लोणी आदी ठिकाणी शेततळे, रोहयो कामाची पाहणी, चारा छावण्या, नदी खोलीकरण, जलयुक्त शिवार अभियानास भेट देऊन आढावा घेतला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंत्री शिंदे यांनी दुष्काळ परिस्थितीत शेतकऱयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना सुद्धा दिलेले आहे.

Leave a comment

0.0/5