Skip to content Skip to footer

पराभव दिसत असल्याने ममता बॅनर्जींचे जळफळाट – अमित शहा

पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या भाजपा कार्यकर्ते आणि तृणमूल कार्यकर्त्याच्या गदारोळा नंतर आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांन कडून करण्यात आलेल्या हिंसाचाराचे असमर्थ शहा यांच्या कडून करण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांना आपला पराभव दिसू लागल्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल झालेला आहे. तसेच तेथे राष्ट्रपती लागवट लागू करण्याची काहीही जरुरत नाही. या येणाऱ्या २३ तारखेच्या निकाला नंतर पश्चिम बंगालची जनता त्यांना कायमची घरी बसवेल असे सुद्धा शहा यांनी बोलून दाखविले होते.

शाह म्हणाले, बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यात बंगाल सोडून देशात कुठेही हिंसाचार नाही, केवळ इथेच झाला आहे. भाजपा देशभरात निवडणूक लढवत आहे. तर तृणमुल काँग्रेस केवळ बंगालमधील ४२ जागा लढवत आहे. त्यामुळे माझ्या रोड शो दरम्याचा हिंसाचार हा तृणमुल काँग्रेसनेच घडवून आणला आहे. पराभवाच्या भीतीने आणि व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी हे सर्व सुरु आहे तसेच पोलीस हिंसाचारावेळी मुकपणे सर्व काही पाहत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. रोड शो पूर्वी आमची पोस्टर्स फाडली तरी भाजपा शांत राहिली. रोड शो सुरु झाल्यानंतर दोन ते अडीच लाख लोक जमा झाले होते. दरम्यान, तीन वेळा हल्ला झाला. तिसऱ्या वेळी जोरदार दगडफेक आणि केरोसीन बॉम्ब फेकण्यात आले, असा दावा यावेळी अमित शाह यांनी केला. यावेळी त्यांनी घटनेचे काही फोटोही सादर केले.

संध्याकाळी साडेसात वाजता ही हिंसाचाराची घटना घडली. त्यावेळी कॉलेज बंद झाल्याने गेटही बंद होते. हिंसाचारावेळी भाजपाचे कार्यकर्ते या गेटच्या बाहेर होते, मध्ये पोलीस होते मग तरीही हे गेट कोणी खोलले? तसेच आतमध्ये दोन खोल्यांदरम्यान असलेल्या पुतळ्याची तोडफोड कशी काय झाली? या कॉलेजवर तृणमुलचे प्रशासन आहे. त्यामुळे ही तोडफोड ममतांच्या कार्यकर्त्यांनीच केली असून त्यांचेच लोक आतून दगडफेकही करीत होते, असा दावा यावेळी शाह यांनी केला.

Leave a comment

0.0/5