Skip to content Skip to footer

एखाद्याचा खून केला की, दशहतवादी होत नाही – शरद पोंक्षे

स्वतंत्र भारताचे पहिले दशहतवादी म्हणून नथुराम गोडसे ओळखले जातात अशी टिपणी काही दिवसापूर्वी सिनेअभिनेता कमल हासन यांनी केली होती. कमल हासन यांच्या या वक्त्यव्या वरून संपूर्ण हिंदुस्तानात त्यांच्या विरोधात रान उठले होते. त्यात आता मराठी सिने सृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे यांनी सुद्धा कमल हासन यांच्यावर टीका केलेली आहे.

एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही असं म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी कमल हासन यांचा निषेध केला आहे. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे विधान अभिनेते कमल हासन यांनी केले होते.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन यांच्या वक्तव्याचं समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हणाले, ‘जेव्हापासून भाजपा सत्तेत आहे तेव्हापासून गोडसेचं समर्थन सुरू आहे.’ यावर प्रत्युत्तर देत शरद पोंक्षे म्हणाले, नथुराम गोडसे हे नाटक काँग्रेस सत्तेत असताना आले होते.

भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असताना नाटकावर बंदी आणली होती. मग आता असे म्हणायचे का की काँग्रेसने नथुराम गोडसेला पाठिंबा दिला?’ ‘दहशतवाद ही संकल्पनाच वेगळी असून एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे ही गोष्ट वेगळी आहे. एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही,’ असे देखील पोंक्षे म्हणाले होते.

Leave a comment

0.0/5