Skip to content Skip to footer

बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे

सीबीआयने गुरूवारी दिल्ली न्यायालयातून बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर मागे घेतली आहे. फेब्रु 2018 मध्ये सीबीआयने नव्या पुराव्यांकडे न्यायालयाचं लक्ष वेधत न्यायालयात सीबीआयने याचिका दाखल केली होती.

बोफोर्स प्रकरणातील आणखी एक याचिकाकर्ते अजय अग्रवाल यांनीही या प्रकरणातील याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ही याचिका मागे घेण्याचे कारण सीबीआयलाच माहिती असावे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, बोफोर्स प्रकरणावरून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत असते. या लोकसभा निवडणुकीतही भाजपने काँग्रेसला याच मुद्द्यावरून लक्ष्य केलं होतं

Leave a comment

0.0/5