‘मिड डे’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या 12 ते 15 जबाबांपैकी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांमध्ये साधर्म्य आढळलेलं नाही.
नाना पाटेकर, तनुश्री दत्ता प्रकरणातील कोणत्याच साक्षी दाराला तनुश्रीने सांगितलेल्या घटनाक्रमांपैकी काहीच आठवत नसल्याच समोर आलं आहे.
माझं शोषण झालं होतं, हे सिद्ध करण्यासाठी मला कोणा साक्षीदाराची गरज नाही. साक्षीदार नानांचे मित्र असतील तर त्यांच्या आणि माझ्या साक्षीत फरक हा आढळणारच आहे, असं तनुश्रीने म्हटलं आहे.
ज्यांना खरं काय ते ठाऊक होतं त्यांच्याकडून खोटी साक्ष घेण्यात आल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे.