Skip to content Skip to footer

निवडूक अयोग्य देणार कर्मचाऱयांना मतमोजणीची प्रशिक्षण….

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या दोन दिवसात पार पडणार आहे. तसेच देशातील अनेक उमेदवारांचे राजकीय भवित्यव्य मतमोजणी मशीन मध्ये बंद होणार आहे. त्यातच आता लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने गुरुवारी १६ मे रोजी गोरेगाव येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान १९ मे रोजी होत असून २३ मे रोजी देशभरात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची तयारी राज्यात सुरू आहे. त्यादृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून मतमोजणीची कार्यपद्धती, मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदींबाबत यावेळी माहिती दिली जाणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर निकाल प्रदर्शित करणे, व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठय़ांची मोजणी याबाबत अभिरुप मतमोजणीचे (मॉक काऊंटिंग) प्रत्यक्ष प्रशिक्षण यावेळी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे

Leave a comment

0.0/5