Skip to content Skip to footer

प्रत्येक धर्मात दशहतवादी असतो, कमल हसन पुन्हा बरगळले….

नथुराम गोडसे हे स्वतन्त्र भारताचे पहिले दशहतवादी होते असे वादग्रस्त विधान काही दिवसापूर्वी कमल हसन यांनी एका सभेमध्ये केले होते. त्यामुळे अनेक हिंदुत्वादी संघटनेचा रोष कमल हसन यांनी ओढावून घेतला होता. आता त्यातंच पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान करून खळबळ माजवलेली आहे. मला असल्या हल्ल्यांची भीती वाटत नाही, प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत, आपण प्रामाणीक असल्याचा दावा कुणीही करू शकत नाही. प्रत्येक धर्मात कट्टरपंथी आहेत याबाबतचे इतिहासात दाखले आहेत” असे कमल हसन यांनी बोलून दाखविले होते.

काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाचा प्रचार करताना ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला हिंदू दहशतवादी होता’ अशी शेरेबाजी करून वाद ओढवला होता. आता त्यातच पुन्हा सर्व धर्मावर टीका करून प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना कमल हसन दिसत आहे. परंतु आज सर्वच समाजावर टीका करून ते काय सध्या करणार आहे हे अजून सुद्धा समजलेले नाही आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला अटक होण्याची भीती नाही, जर मला अटक झाली तर नवीन समस्या निर्माण होतील”,वर “हा इशारा नसून सुचना आहे” अशी मखलाशीही त्यांनी केली.

Leave a comment

0.0/5