साक्री विधानसभा मतदारसंघाती काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाने दोघांजा जीव घेतला आहे. आमदारांच्या वाहनचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत दोन सख्ख्या भावांना धडक दिली आणि या धडकेत दोन्ही सख्खे भाऊ जागीच मृत्यूमुखी पडले. आमदार डी. एस. अहिरे यांचा वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवत होता, असा गंभीर आरोप मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांच्या नातेवाईकांनी केला आहे.
मालांजन येथील सोनवणे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ लग्न लावून परत येत असताना ते धाडणे फाट्याजवळ आले आणि त्यांना आमदार अहिरे यांच्या वाहनाने त्यांच्या साक्षीने धडक दिली. या धडकेने दोन सख्ख्या भावांचा बळी घेतला. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी पुढे पाठवायची तसदी न घेता स्वतः आमदार आणि त्यांच्या चालकाने तेथून पळ काढला. अपघातातील जखमींना वाऱ्यावर सोडले आणि नंतर दुदैवाने त्यांचा मृत्य ओढवला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.