Skip to content Skip to footer

मागच्या दरातून आलेले घर फोडणारे गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा-जयदत्त क्षीरसागर

राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच शिवसेना पक्षाचे सदस्यता स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे. आता राष्ट्रवादी पक्षात पहिल्या सारखा राष्ट्रवाद राहिलेला नाही आहे असे सुद्धा बोलून दाखविले होते. वादळात ज्या दिव्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे हात त्या दिव्याभोवती धरले त्याच दिव्यामुळे हात पोळायला लागले तर काय करायचे? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.

जयदत्त क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्तांची बैठक बोलावली होती. या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्षनेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली होती. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा, असे म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतले जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात का राहावं? असा सवाल जाहीर सभेत क्षीरसागर यांच्या समर्थकांनी उपस्थित केला होता.

Leave a comment

0.0/5