Skip to content Skip to footer

आमची आघाडी जनतेला पसंत पडली नाही – राजू शेट्टी

राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढत असून त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना संधी दिली आहे. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही टप्प्यात दोघेही पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सेनेचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना चांगली लढत दिली असून सांगलीत विशाल पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मतमोजणीची सुरुवातीचे कल पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस – राष्ट्रवादी यांची आघाडी जनतेला पसंत पडलेली नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

दरम्यान,लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आज देशातील जनतेने कोणाला पुढील पाच वर्ष सत्ता दिली आहे हे स्पष्ट होणार आहे. पहिल्या फेरीचे कल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४७ जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल ३८ जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Leave a comment

0.0/5