दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विजय……..

राहुल शेवाळे | Rahul Shewale Vijay in South Central Mumbai

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेने बाजी मारली आहे. राहुल शेवाळे यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर मुंबईतील या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. पण, राहुल शेवाळे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये देखील राहुल शेवाळे विजयी झाले होते. दक्षिण मध्य मुंबई म्हणजे दादर, माहीम यासारखा शहरी मध्यमवर्गीयांचा भाग आणि धारावीमधले कष्टकरी गरीब लोक असा संमिश्र स्वरूपाचा राखीव मतदारसंघ आहे. या भागात शिवसेनेची देखील ताकद असून राहुल शेवाळे यांचा संपर्क देखील दांडगा होता.

२००९ मध्ये इथे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा हेच उमेदवार आमनेसामने होते. दक्षिण मध्य मुंबईत सायन, वडाळा, माहीम, चेंबूर आणि अणुशक्ती नगर ह्या विधानसभेच्या जागा येतात. परंतु या मतदार संघात युतीचे उमेवार राहुल शेवाळे यांच्या मागील पाच वर्षाच्या दांडग्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा जनतेने त्यांना खासदार म्हणून निवडून आणले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here