Skip to content Skip to footer

दादर येथील शिवसेना मुख्य कार्यालयात भगवा जल्लोष….

लोकसभा निवडणुकीच्या निकालात देशातील जनतेने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षावर विश्वास ठेऊन पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिलेल्या आहे. देशात भाजपाला मिळालेल्या यशानंतर संपूर्ण देशात भाजपा कार्यकर्त्यांते दिवाळी साजरी करताना दिसत आहे. तर महाराष्ट्रात देखील शिवसेना पक्ष सुद्धा मुसंडी मारून विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या यशा नंतर पक्षाचे मुख्य कार्यालय असलेल्या दादर पश्चिम येथील शिवसेना भवनात तर जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आज लोकसभेचा निकाल जाहीर होत असताना शिवसेना भवनात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत होती. त्यातच येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था सुद्धा भवनाच्या बाहेर करण्यात आलेली होती. ढोल, ताशा,फटाक्याचा आवाज आणि गुलालाच्या उधळल्याने जणू संपूर्ण शिवसेना भावनाच्या परिसरात उस्सव असल्या सारखे वातावरण निर्माण झाले होते. या सर्वात महिला शिवसैनिकांची गर्दी आवर्जून पाहायला भेटत होती. “शिवसेना जिंदाबाद”, ” ये तो झाकी है दिल्ली अभी बाकी है” अशा गाजरांत भावनांचा परिसर दुमदुमून निघाला होता

Leave a comment

0.0/5