Skip to content Skip to footer

अढळरावांनी केले मोठ्या मनाने डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिनंदन……

सलग तीन वेळा शिरूर मतदार संघातून खासदार राहिलेले शिवाजी अढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या कडून पराभव झालेला आहे. या पराभवा नंतर अढळराव पाटील यांनी खचून न जाता मोठ्या मानाने विजयी उमेदवार अमोल कोल्हे यांचे आपल्या फेसबुकपेज वरून अभिनंदन केले आहे. आपल्या फेसबुक पेज वरून कोल्हे यांना अभिनंदन देताना मतदार संघातील मतदारांचे सुद्धा आभार मानले आहे. काही महिण्यापुर्वी कोल्हे यांना राष्ट्रवादी कडून उमेदवारी जाहीर झाल्या पासूनच साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदार संघाकडे लागलेले होते.

शिरूर मतदार संघातील ह्या लढतीकडे पहिले असता शिवसेना सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना उतरविण्याचा मास्टर प्लॅन खुद्द शरद पवारांनी तयार केला होता. आज स्वराजरक्षक छत्रपती संभाजी मालिकेच्या यशामुळे घराघरात पोहचलेल्या चेहऱ्याचा अमोल कोल्हे यांना पुरेपूर फायदा यंदाच्या निवडणुकीला झालेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रचाराला संपूर्ण वेळ न देऊन सुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरातील लोकांची मने जिंकण्यात कोल्हे आपल्या विजयाने यशस्वी झालेले दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5