Skip to content Skip to footer

नगर मध्ये दशहत माजवली तर घड्याळ्याची बॅटरी बाजूला काढून ठेवेल – खा. सुजय विखे

मी राधा-कृष्ण विखे पाटील नसून मला किंवा माझा घरातल्यांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा नगरचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिलेला आहे. दशहत माजऊन नगर मधील सामान्य नागरिकांना कोणी त्रास दिला तर आधी सुजय विखे यांना सामोरे जावे लागेल. जिल्ह्यात कुठल्याही घडाळ्यामध्ये मी आता बॅटरी ठेवणार नाही असा इशारा सुद्धा दिलेला आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांना ज्यांनी त्रास दिलेला आहे आता त्यांच्या नातवाने चोख उत्तर दिलेले आहे असेच आज नगर मध्ये बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते एमआयडीसी येथील कार्यालयात संवाद साधत होते. पालक मंत्री राम शिंदे, माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान सभेचे उपाध्यक्ष विजय औटीं आधी नेते उपस्थित होते. मागील पाच वर्षात भाजपा सरकारने केलेल्या कामाचा आज निकाल दिसत आहे असे सुद्धा मंत्री राम शिंदे यांनी बोलून दाखविले होते.

पुढे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माजी मंत्री अनिल राठोड यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. एक ऐतिहासिक निवडणूक आज पार पडली. सुजय विखे यांच्या विजयाने बाळासाहेब विखेपाटील यांची आठवण झाली. आमच्यावर सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी होती आणि ती आम्ही पार पाडलेली आहे.

Leave a comment

0.0/5