Skip to content Skip to footer

शिवसेनेने अरविंद सावंत या आपल्या माणसाला पुन्हा दिल्लीत पाठविला..

शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अतोनात प्रयत्न केले होते. तसेच शिवसेना पक्षा बद्दल खोटी अफवा सुद्धा पसरविण्याचा प्रयत्न देवरा यांच्या कडून करण्यात आलेला होता. पण विरोधकांची कारस्थाने अपयशी ठरली. ज्योतिषांचे निकाल चुकले, सट्टेबाजांचे अंदाज फेल गेले. महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी लाखांचे मताधिक्य घेत काँग्रेस आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांना धूळ चारली. सुज्ञ मतदारांनी जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या आणि ते सोडवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या शिवसेनेचा ‘आपला माणूस’ पुन्हा एकदा दिल्लीत पाठवला.

दक्षिण मुंबईत काँग्रेसने मिलिंद देवरा यांना निवडून आणण्यासाठी मुंबईतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची फौजच कामाला लावली होती. पण निष्ठावान शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेली मेहनत, दक्षिण मुंबईतील नागरिकांचे शिवसेनेवर असलेले अतोनात प्रेम यापुढे ती कुचकामी ठरली. देवरा यांनी विजयासाठी बरीच कारस्थाने केली. शिवसेनेची बदनामी केली. जैन धर्मीयांबद्दल वादग्रस्त विधाने केली. गिरणी कामगारांना शिवसेनेविरोधात भडकावण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी मतपेटीतून महायुतीच्या बाजूनेच कौल देत देवरा यांना तोंडघशी पाडले आणि भारी बहुमतांनी अरविंद सावंत यांना विजय करून आणले होते.

Leave a comment

0.0/5