Skip to content Skip to footer

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार ?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून शिवसेनेकडून आता त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. तसेच हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5