नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना कृषिमंत्री करण्यात यावे अशी मागणी नाशिक मधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. संजय साठे असे या शेतकऱ्याचे नाव असून गेल्यावर्षी याच शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले १०६४ रुपये पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केले होते. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. येत्या ३० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, गेल्यावर्षी नाशिक मधील एका शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले १०६४ रुपये पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केले होते. त्याच संजय साठे या शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींना नितीन गडकरी यांना कृषिमंत्री करा अशी मागणी केली आहे.
संजय साठे या शेतकऱ्याने लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारने दणदणीत विजय मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. त्याचबरोबर एक गांधी टोपी, दोन रुमाल आणि एक हस्तलिखीत पत्र अशी भेट पाठवली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करु इच्छितो. यामुळेच परंपरेनुसार मी त्यांना एक पांढरी टोपी आणि दोन मोठे रुमाल पाठवले आहे. सोबतचं नितीन गडकरी यांना कृषिमंत्री करण्यात यावे यासाठी पंतप्रधान मोदींकडे आग्रह केला असल्याचे त्यांनी सांगितले