Skip to content Skip to footer

पवारांचा पक्ष गमावणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा…………..

लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी नंतर आपल्या पक्षाचा असणारा राष्ट्रीय दर्जा गमवण्याची वेळ आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यांच्यावर राष्ट्रीय दर्जा गमवण्याची वेळ येणार आहे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने जर त्यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला तर तो पुन्हा भेटणे अधिकच कठीण आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता पर्यंत सात पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी पक्ष,भारतीय कम्युनिष्ट पक्ष आणि बीएसपी या पक्षांना फक्त राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या पक्षांना चार राज्यात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्तही मते पडतात त्या पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. त्याच प्रमाणे या पक्षांना तीन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यातून खासदार निवडून आणतानाच चार राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा सुद्धा मिळवावा लागतो. २०१६ मध्ये बदलेल्या नियमा प्रमाणे ५ वर्षा ऐवजी १० वर्षाच्या कामगिरीचा आढावा आता घ्यावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवणे कठीण जाणार आहे.

Leave a comment

0.0/5