Skip to content Skip to footer

अभिनेता करण ओबेरॉय प्रकरणातील पीडितेवर हल्ला करणारे अटकेत

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौघांना अटक   करण्यात आली आहे. काल सायंकाळी या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या चौघांचाही करण ओबेरॉयशी काहीही संबंध नाही आहे. झिशान अहमद (२३), अराफत अहमद (२१), जितीन संतोष (२१) , अल्तमाश अन्सारी (२२) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

 

ज्या ठिकाणी पीडित महिलेवर हल्ला झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता आम्हाला बाईकचा नंबऱ मिळाला. त्याआधारे आम्ही बाईकचा मालक झिशान अहमद याला बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केल्यानंतर अराफत अहमद हा त्याची बाईक घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आम्ही अराफत, जितीन व अल्तमाश यांना सांताक्रुझमधून अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

करण ओबेरॉयविरोधात एका ३४ वर्षीय महिला ज्योतिषीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर करण ओबेरॉयला अटक करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी या प्रकरणातील आरोपी महिला मॉर्निंग वॉकला गेली असताना बाईकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तिच्या दिशेने एक कागद फेकला आणि त्या कागदावर केस मागे घे असे लिहिलेले होते.

Leave a comment

0.0/5