एव्हरेस्ट सर करणारा अकलूजचा गियारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट कॅम्प-४ (२६००० फूट) वर अति थकव्याने २३ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला होता. तब्बल नऊ दिवसानंतर त्याचे प्रेत मुंबईहुन अकलूज या गावी पोहचल्यानंतर त्याच्यावर शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. निहालच्या अंत्ययात्रेमुळे अकलूज शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते़ अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.
निहाल बागवान याने २३ मे रोजी सकाळी ८.३० वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर निहाल व त्याच्या शेपार्ने खाली उतरण्यास सुरूवात केली होती़ एकाच दिवशी जगभरातील २०० पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करत असल्यामुळे अनेक वेळा जाम होऊन प्रत्येक गियारोकाला खूप वेळ थांबावे लागत होते. अश्यातच अतिशय थकव्यामुळे कॅम्प-४ येथे पोहचून निहाल बागवान याने शेवटचा श्वास घेतला होता अशी माहिती नेपाळ येथील कंपनी ‘पिक प्रमोशन प्रा. लि.’ चे केशव पुडीया यांनी दिली होती़ त्याच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्याचा मृतदेह एव्हरेस्टवरून खाली उतरविले होते. त्यानंतर तब्बल नऊ दिवसानंतर त्याच्यावर अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.