Skip to content Skip to footer

दिल्ली ते नाशिक विमान सेवा लवकरच सुरु….

देशाच्या राजधानीत जाऊ इच्छिणाऱ्या नाशिककारांना दिलासा मिळाला आहे. कारण नाशिक-दिल्ली विमानसेवा आता पुन्हा होणार सुरू आहे. ही विमानसेवा १५ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. देशातल्या छोट्या शहरातील लोकांना विमानसेवेचा वापर करता यावा म्हणून सरकारने उडाण योजनेची घोषणा केली होती. त्याअंतर्गत नाशिकपासून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. पण नाशिक-दिल्ली ही विमानसेवा नंतर काही कारणास्तव बंद झाली होती. पण आता ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली असून आठवड्यातून ३ दिवस प्रवाशांना ही सेवा अनुभवता येईल.

जेट एअरवेजनंतर अलायन्स एअरकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या हैदराबाद आणी अहमदाबाद या शहरांना नियमित विमानसेवा सुरू आहे. येत्या काही दिवसात गोवा आणि बंगळुरू ही शहरंही नाशिकला हवाई मार्गांने जोडली जाणार आहेत. दरम्यान, उडाण योजनेअंतर्गत देशभरातील अनेक छोटी शहरं विमानसेवेने जोडली जाणार होती. एअर डेक्कन ही कंपनी कमीत कमी भावात सर्वसामान्यांना विमानाची सेवा घडवणार होती.

Leave a comment

0.0/5