Skip to content Skip to footer

मंत्री मंडळाचा धडाकेबाज निर्णय शहीद पोलिसांच्या मुलांना शिष्यवृत्ती तर शेतकऱ्यांना पेन्शन..

शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ करताना वीरमरण आलेल्या पोलिसांच्या मुलांचाही या योजनेत समावेश, शेतकरी सन्माननिधी योजनेचा विस्तार, पशुधन रोग निवारणासाठी आर्थिक साह्य़, शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक निवृत्तिवेतन योजना आणि किरकोळ विक्रेत्यांबरोबरच स्वयंरोजगार क्षेत्रातील व्यक्तींना निवृत्तिवेतन; असे अनेक धडाकेबाज निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतले. महाविजयानंतर पदभार स्वीकारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. त्या बैठकीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब करीत ‘जय जवान, जय किसान’ याच मंत्राचा कृतीशील उच्चार जणू सरकारने केला आहे.

या आधी शहीद जवानांच्या मुला-मुलींनाच केवळ सरकारतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत होती. मुंबई हल्ल्यात प्राण हल्ल्यात प्राण गमावलेल्या तुकाराम ओंबाळे यांच्या मुलीला या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यानंतर हा प्रश्न प्रथमच चर्चेत आला होता. ती त्रुटी आता सरकारने दूर केली आहे. आता नक्षलवादी, माओवादी अथवा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे शिष्यवृत्तीच्या प्रमाणातही वाढ करण्यात आली आहे. याआधी मुलांसाठी दरमहा दोन हजार, तर मुलींसाठी २,२५० रुपये या योजनेनुसार दिले जात होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून मुलांना दरमहा अडीच हजार तर मुलींना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत.

Leave a comment

0.0/5