ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वयार्सारखी दिसत होती. तिचे नाव म्हणजे स्रेहा उल्लाल. सलमान खानची हीच हिरोईन सध्या रूग्णालयात भरती आहे. ३१ मे रोजी तिला रूग्णालयात भरती करण्यात आले. खुद्द स्नेहाने सोशल मीडियावर रूग्णालयातील दोन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘आयुष्यात पहिल्यांदा रूग्णालयात भरती झाले,’ असे तिने लिहिले आहे. डॉक्टरांनी स्रेहाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
आयुष्यात पहिल्यांदा रूग्णालयात भरती व्हावे लागले. मला ताप आहे. उपचारासाठी रूग्णालयाच्या बेडवर आहे. हे सगळे घाबरवणारे आहे. पण मी लवकर बरी होईल. मला डॉक्टरांनी अधिकाधिक विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. घरी परतण्यासाठी उत्
२००५ मध्ये सलमान खानने स्रेहाला ब्रेक दिला होता. ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता. पण यानंतर स्रेहा बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. २००६ मध्ये सोहेल खानसोबत ‘आर्यन’मध्ये ती झळकली. यानंतर २०१० मध्ये ‘क्लिक’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत दिसली. पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले. यानंतर स्नेहा साऊथच्या चित्रपटांकडे वळली. तेलगू व कन्नड चित्रपटांत ती दिसली. पण त्यानंतर गत चार वर्षांपासून ती अचानक चित्रपटांपासून दूर झाली. याचे कारणही आजार हेच होते.
सुक आहे,’असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.