Skip to content Skip to footer

पाकीस्तान म्हणजे दारू पिऊन झिंगलेले माकड…….

रमजानच्या पवित्र महिन्यात शनिवारी पाकिस्तान मधील भारतीय उच्चयुक्तालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या इफ्तार पार्टीमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना गैरवर्तुनुकीचा सामना करावा लागला होता. पाकिस्तान कडून मिळालेल्या गैरवर्तुनुकीचा आता सर्व स्थरातून निषेध होत आहे. राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत असतानाच पाकिस्तानच्या या कृत्यावर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून पाकिस्तानच्या या वर्तुणुकीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

“मध्यपान करून त्याच नशेत झिंगणारी माकडे” असा उल्लेख शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पाकिस्तानच्या कृत्यावर भूमिका स्पष्ठ करण्यात आलेली आहे. इफ्तार पार्टी मध्ये भारतीय अधिकाऱ्यांना दिलेली वागणूक अतिशय निंदनीय आहे. असे मत सुद्धा मांडण्यात आलेले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. तेव्हापासूनच पाकिस्तान आणि भारताच्या नात्यामध्ये असणारा तणाव आणखी वाढलेला दिसून येत आहे.

त्यातच मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पण, पाकिस्तानकडून भारतासोबत शांततापूर्ण चर्चा करण्याची आग्रही भूमिका वारंवार मांडली गेली. असे असले तरीही इफ्तार पार्टीत घडलेला प्रसंग पाहता हे खरंच शांततेसाठी पाकिस्तानकडून उचलण्यात आलेलं पाऊल आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कर्जबाजारीपणामुळे पाकिस्तानची हतबलता आणि दहशतवादी कारवायांमुळे येथे वाढलेली अराजकता हे मुद्दे अधोरेखित करत पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांची ‘फॅक्टरी’च आहे, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5