Skip to content Skip to footer

एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना अध्यक्ष दिवाकर रावते यांची अनोखी भेट……..

एसटीतील मुस्लीम कर्मचाऱ्यांना रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात यावा. त्यासाठी त्यांचे मे महिन्याचे वेतन तीन दिवस अगोदर खात्यात जमा करण्यात यावे अशी सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आदेश एसटी प्रशासनाला दिलेले आहे. एसटी महामंडळाच्या ७१ व्या वर्षात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एसटीतील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिण्याच्या ७ तारखेला होतो. मात्र यावेळी ५ जूनला रमजान ईद आहे. यामुळे मुस्लीम बांधवांचा सण लक्षात घेऊन तातडीने ४ तारखेलाच त्याचे वेतन देण्यात यावे असा आदेश रावते यांनी दिलेला आहे.

एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी आहे. या सर्वांचा पगार महिण्याच्या सात तारखेला होतो. परंतु अशा विशेष सण, उस्सवावेळी त्यांना कपडे खरेदी करायला किंवा इतर खर्चासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे त्यांना ऍडव्हान्स पगार मिळाला तर त्यांचा आनंद द्विगुण होऊन जाईल. तसेच एसटी महामंडळाने रावतेंच्या आदेशानव्ये या पूर्वी सुद्धा गणपती, दिवाळी सणाला तारखेच्या आधी पगार दिलेले आहे. एसटीत कार्यरत असलेल्या मुस्लीम बांधवांना त्यांचा सण साजरा करताना पैशा अभावी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पगार जूनच्या ४ तारखेला त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

Leave a comment

0.0/5