Skip to content Skip to footer

बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी

सीना नदीवरील बंदलगी बंधाºयाची दुरुस्ती रखडल्याने सत्ताधारी भाजपची नेतेमंडळी हवालदिल झाली असून, विरोधक हाच विषय आगामी काळात लावून धरण्याच्या तयारीत आहेत. तीन वर्षे उलटून गेली तरी बंधाºयाची दुरुस्ती न झाल्याने या काळात शेतकºयांचे तब्बल ७ कोटींचे नुकसान झाले आहे.

सन २०१६ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात बंदलगी बंधाºयाचे मोठे नुकसान झाले. तळापासून बंधाºयाचे स्तंभ उखडून वाहून गेले होते. त्याच्या पाहणीसाठी भाजपच्या तत्कालीन खासदारांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दौरे करून सत्ताधाºयांना चांगलेच जेरीला आणले.

तातडीने दुरुस्तीसाठी शेतकºयांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता याच मुद्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न झाला. वर्षभरात बंधाºयाची दुरुस्ती होण्याची अपेक्षा शेतकºयांना होती; मात्र तीन वर्षे उलटून गेली तरीही या बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे या पावसाळ्यात तरी पाणीसाठा होईल याबाबत शेतकरी साशंक आहेत.
आगामी काळात येणाºया विधानसभा निवडणुकीत या बंधाºयाची दुरुस्ती हाच विरोधकांचा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. शेतकरीही या बंधाºयाची दुरुस्ती रखडल्याने अस्वस्थ आहेत.

गेल्या तीन वर्षांत याबाबत जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकाºयांचे दरवाजे ठोठावलेल्या शेतकºयांना राजकीय पाठबळ मिळाले नाही; मात्र आता हा मुद्दा सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याची चर्चा आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील दुसरी फळी सक्रिय होत आहे.

स्थानिक शेतकºयांमध्ये धुमसत असलेला असंतोष बाहेर काढण्याचा प्रयत्नही दुसरी फळी करण्याच्या तयारीत आहे.

७६० हेक्टर क्षेत्र सिंचनाविना
– बंदलगी बंधारा वाहून गेल्याने या बंधाºयावर अवलंबून असलेल्या शेतकºयाांची मोठी हानी झाली आहे.  बंधाºयामुळे ७६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सप्टेंबर २०१६ मध्ये आलेल्या पुराने बंधाºयाच्या मध्यभागातील स्तंभ वाहून गेले. त्यामुळे पाणीसाठा होत नाही. हेक्टरी सरासरी २० हजार प्रमाणे गेल्या तीन वर्षांत शेतकºयांचे सात कोटी शेतीचे उत्पन्न नुकसान झाले़

तीन वर्षे काम सुरूच
– सन १९७६ मध्ये सीना नदीवर बंदलगी येथे हा को.प. बंधारा बांधण्याचे काम सुरु झाले.तीन वर्षात बंधारा पूर्ण झाला आणि १९८० पासून सिंचनासाठी बंधाºयाच्या पाण्याचा उपयोग सुरू झाला. गेल्या तीन वर्षांपासून या बंधाºयाचे काम सुरूच आहे. आजदेखील ते अर्धवट स्थितीत आहे.त्यामुळे यंदातरी बंधाºयात पाणीसाठा होईल का याची चिंता शेतकºयांना लागून राहिली आहे.

Leave a comment

0.0/5