Skip to content Skip to footer

मानवत, पाथरी तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान

जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामपुरी,  कोल्हा, केकरजवळा तर पाथरी तालुक्यातील बाबूलतार व लिंबा परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयांमुळे घरे व पिकांचे मोठे नुकसान झाले असून, मोठ मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत़

परभणी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वा-यांसह जोरदार पाऊस झाला़ पाथरी तालुक्यातील लिंबा येथे सायंकाळी ६ च्या सुमारास वादळी वाº्यासह पाऊस झाल्याने अनेक झाडे उन्मळून पडली़ अनिरुद्ध भोसले हे शेतकरी शेतात बांधलेली शेळी सोडण्यासाठी गेले असता, त्यांच्या अंगावर बाभळीचे झाड पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी धावले व त्यांनी भोसले यांच्या अंगावरील झाड बाजुला केले़ त्यानंतर त्यांना परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले़ तालुक्यातील विटा बु़ येथेही अवकाळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली़ बाबूलतार शिवारात झालेल्या पावसामुळे विष्णू देवराव थिटे यांच्या दोन एकर शेतीतील २ हजार ५०० केळीची झाडे आडवी झाली़ त्यामुळे त्यांचे जवळपास साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़

तसेच गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले़ विजेच्या तारा तुटल्या़ त्यामुळे गावातील वीज पुरवठा मंगळवारी सायंकाळपासून खंडीत झाला आहे़ बुधवारी दुपारी १२ पर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता़ मानवत तालुक्यातील कोल्हा, केकरजवळा भागालाही पावसाचा तडाखा बसला़ यामध्ये अनेक घरांवरील पत्रे उडून गेली़ पोहंडूळ येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला़ तालुक्यातील रामपुरी येथे वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली़ तसेच संदीप हिक्के, शिवाजीराव रामराव यादव, मधुकरराव लिंबाजीराव यादव, रमेश यादव, अंकुश यादव, गुलाबराव यादव, ज्ञानेश्वर यादव यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़

जिल्ह्यात ४़६२ मिमी पाऊस
महसूल विभागाकडे बुधवारी सकाळी ७ वाजता झालेल्या नोंदीनुसार मंगळवारी रात्री जिल्ह्यात ६़४२ मिमी पाऊस झाला आहे़ दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण १०़०१ मिमी पाऊस झाल्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे़

Leave a comment

0.0/5