Skip to content Skip to footer

बिबट्याच्या हल्ला : संगमनेरमधील चार जण जखमी

: तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील गायकवाड वस्ती आणि जांभळीचा मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (६ जून) सकाळी पावणे सात ते आठच्या सुमारास हा प्रकार घडला. कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय अडीच वर्ष) आणि संजय जगन भडांगे (वय ४०) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. कृष्णा हा अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

तेथे असलेल्यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यांनतर सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या दोन वनमजुरांवर हल्ला केला. संजय भुजबळ व एकनाथ थेटे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. वन विभागाचे अधिकारी व पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

Leave a comment

0.0/5