Skip to content Skip to footer

शेवगाव तालुक्यातील ७७ वर्ग खोल्यांच्या निर्लेखणास मंजुरी

शेवगाव : तालुक्यातील ५९ शाळा मधील १५३ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेकडे मागील वर्षी सादर करण्यात आला. यापैकी २९ शाळेतील ७७ वर्ग खोल्याच्या निर्लेखणास मंजुरी मिळाली असून उर्वरित ३१ शाळेतील ७६ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वर्ग खोल्यांच्या नवीन बांधकामासाठी मुहूर्त मिळत नसल्याने यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील विविध शाळेतील तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातील नजीकच्या समाज मंदिर, अंगणवाडी इमारतीत शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ आली आहे.

शेवगाव तालुक्यात२२९ प्राथमिक शाळा असुन वर्ग खोल्यांची संख्या ८५० असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ५०० पर्यत असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आली. तालुक्यातील ५९ शाळेतील १५३ वर्ग खोल्या मोडकळीस आल्या असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी त्या गैरसोयीच्या असल्याने वर्ग खोल्यांच्या निर्लेखणाचा प्रस्ताव मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला.

यापैकी २९ शाळेतील ७७ वर्ग खोल्यांच्या निर्लेखणास मंजुरी मिळाली असून निर्लेखणाच्या कामास सुरुवात झाल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आली. उर्वरित ३१ शाळेच्या ७६ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आली. निर्लेखणाच्या प्रस्तावास समाविष्ट असल्यास तालुक्यातील शाळेचे वर्ग गेल्या काही दिवसापांसून गावातीलच समाजमंदिर तसेच अंगणवाडी इमारतीपैकी सोयीच्या ठिकाणी भरविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सुद्धा वर्ग खोल्यांच्या निर्लेखणास मंजुरी मिळवून नवीन वर्ग खोल्याच्या बांधकामास गती मिळून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

तालुक्यातील ५९ शाळेतील १५३ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव जिल्हा परिषदे कडे सादर करण्यात आला होता. यापैकी २९ शाळेतील ७७ वर्ग खोल्याचा निर्लेख्णाचा प्रस्ताव मंजूर झाला असून उर्वरित प्रस्तावाचा पाठ पुरावा सुरु आहे. तसेच नवीन वर्ग खोल्यांचा बांधकामास मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे गटशिक्षणाधिकारी शैलजा राउळ यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5