Skip to content Skip to footer

पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीने कार्यकर्ते गळफास लावण्याच्या तयारीत

सांगोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज शुक्रवारी मुंबई येथे बैठक होणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वळविले आहे. आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास घेणार आहेत.

बारामतीचे जास्तीचे पाणी घेऊ देणार नसल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी शिवाजी चौक येथील चिंचेच्या झाडास दोर लावून फास बांधण्यात आले आहेत, जर बैठकीत निर्णय सांगोलकरांच्या विरोधात गेल्यास अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5