Skip to content Skip to footer

दुष्काळामुळे राज्यात ऊसाचे उत्पादन घटणार : प्राथमिक अंदाज

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे आगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल. त्यामुळे साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत घट होऊ शकते. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षासाखरेच्या उत्पादनात ४२ लाख टनांची घट होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आगामी ऊस हंगामाचा अंदाज आणि नुकत्याच संपलेल्या हंगामाची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन होत आहे. राज्यात २०१७-१८ या हंगामात ९५२.६० लाख टन ऊस गाळपातून विक्रमी १०७.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ९५२.११ लाख टन ऊस गाळपातून १०७.२० लाख टन साखर उत्पादित करुन गेल्या वेळचा विक्रम मोडला गेला. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात फारसा पाऊस झाला नाही. तसेच, परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून, वळवाचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे चाºयासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस जात आहे. अजूनही राज्यात मॉन्सून सक्रीय झालेला नसल्याने चाºयासाठी आणखी ऊस तोडला जाऊ शकतो.
कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी 
राज्यात ५९ सहकारी आणि ५२ खासगी कारखान्यांमधे सहविज प्रकल्प आहेत. यातून कारखान्यांनी गेल्या हंगामात २२१.१३ कोटी युनिट्स विज निर्मिती केली. त्यातील ४७.९६ कोटी युनिट विज स्वत:साठी वापरली असून, १४६.१७ कोटी युनिट्स विज निर्यात केली. त्यातून १ हजार ४१ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न कारखान्यांना मिळाले.

कारखान्यांचे साडेचारशे कोटी महावितरणकडे थकीत
राज्यातील साखर कारखान्यांनी पुरवठा केलेल्या विजेचे तब्बल साडेचारशे कोटी रुपये राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (एमएसइडीसीएल) थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली.

राज्यातील उत्कृष्ट कारखाने 

कारखान्याचे नाव             पहिला                दुसरा            तिसरा
ऊस गाळप            जवाहर सहकारी-कोल्हापूर        विठ्ठलराव शिंदे-सोलापूर        अंबालिका-अहमदनगर
(लाख टन)            (१७.६३ )            (१७.४४)            (१३.६४)
साखर उत्पादन            जवाहर (२२.४७)            विठ्ठलराव शिंदे (१९.२६)        सह्याद्री-सातारा (१६.३१)
साखर उतारा (टक्का)        गुरुदत्त-कोल्हापूर (१३.४१)        दालमिया-कोल्हापूर (१३.२१)     जयवंत-सातारा (१३)
सर्वाधिक गाळप दिवस       विघ्नहर-पुणे (१९५)        सह्याद्री-सातारा (१७५)        सोमेश्वर-पुणे (१७१)

Leave a comment

0.0/5