शेतातील कामात मग्न असलेल्या शेतकºयावर रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरीजखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.मान्सून उंबरठ्यावर आल्याने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत.
यासाठी भल्या पहाटेपासून शेतशिवारात शेतकरी व शेजमजुर काम करताना दिसून येत आहेत. यामध्ये पेन सावंगी येथील शेतकरी उद्धवराव मारोती अंभोरे हे सकाळी आपल्या शेतात काम करत असताना अचानक रानडुकरे पाठीमागून येवून त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने भांबावलेले शेतकरी उध्दवराव अंभोरे यांनी आरडा-ओरड केली असता शेताला लागून असलेल्या शेतातून त्यांचे भाऊ शिवाजी आंभोरेंनी धावत येवून रानडुकरावर काठीने मारून त्यांना हल्ल्यातून सोडविले. ‘