नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने आता यंत्रणा जागी झाली आहे. साप्ताहिक मेंटेनन्सच्या नावावर तास तासभर वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याच्या नावावर बुधवारसोबतच इतरही दिवस वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. विभागातर्फे दावा करण्यात येत आहे की, वादळी वाºयापासून यंत्रणेला नुकसान पोहचू नये म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
जनतेने वीज विभागाच्या दाव्याला मान्य करून, उकाड्यात दिवस काढले. प्रत्यक्षात मात्र विभागाने मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केल्याचे दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रणालीला वादळी वाऱ्यांचा मारा सहन करण्यास असक्षम ठरली आहे. त्यामुळेच वादळी वारे सुरू झाल्याबरोबर वीज कंपनी होणारी हानी लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित करीत आहे. मात्र याला ‘हॅण्ड ट्रिपिंग’चे नाव देऊन नुकसानीपासून बचाव करण्यासाठी पुरवठा खंडित करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागाकडून असेही सांगण्यात येत आहे की, वाºयांची गती जास्त असल्याने समस्या निर्माण होत आहे. वाºयाच्या वेगाने विजेचे खांब वाकायला लागले आहे. ‘झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्याने तारा तुटत आहेत.