Skip to content Skip to footer

आठ वर्षांत वनविभागातील ८२२ अधिकारी, कर्मचा-यांचा मृत्यू, कर्तव्यावरील मृत्यू दहा टक्के

परतवाडा (अमरावती) – राज्य वनविभागाच्या वार्षिक प्रशासकीय अहवालानुसार २००९ ते २०१८ या आठ वर्षांच्या कालावधीत वनविभागातील ८२२ वनअधिकारी व कर्मचा-यांच्या अकाली, अपघाती व कर्तव्यादरम्यान मृत्युमुखी पडले. ही संख्या एकूण पदांच्या १० टक्के आहे. गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील कर्मचा-यांची संख्या यात अधिक आहे. वार्षिक प्रशासनिक अहवालानुसार, आठ वर्षात ४ हजार ६२८ वन अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. १५७ लोक नोकरी सोडून गेले असून, ५५४ अधिकारी-कर्मचारी निलंबित तर ५८ बडतर्फ झाले आहेत.

वनसंरक्षणाचे मूलभूत कर्तव्यातील क्षेत्रीय अधिकारी  व कर्मचा-यांचे वेतन, अपु-या सुविधा, कामाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव, साप्ताहिक रजा  व वैद्यकीय सवलती न देणे, आघाडीवर लढणा-या घटकाची उपेक्षा या आणि अन्य कारणांमुळे कर्मचारी-अधिका-यांच्या एकूण संख्येपैकी १० टक्के लोक मृत्यूला कवटाळत असल्याचे वनविभागातील कर्मचारी व अधिकाºयांच्या संघटनांनी स्पष्ट केले.वनविभागातील कर्मचारी व अधिका-यांच्या व्हॉट्अ‍ॅप ग्रुपवर हा वार्षिक अहवाल शेअर केला जात आहे. यातील आकडेवारी बघून चिंतेसह हळहळ व्यक्त होते आहे.

वनविभागातील आठ वर्षातील ८२२ वनअधिकारी व कर्मचा-यांच्या मृत्यूबाबत केंद्र व राज्याचा मानवाधिकार आयोग, मागासवर्गीय व अल्पसंख्याक आयोग, महिला आयोग यांनी दखल घेतलेली नाही. मृत्यूमूखी पडलेल्या या कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना तीन ते सहा महिन्यांत योग्य तो लाभही वनविभागाकडून तात्काळ दिलेला नाही. वनविभागातील उच्चपदस्थांनीही या कुटुंबांचे सांंत्वन केले नाही, असे कर्मचारी-अधिकारी यांच्या संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वनअधिकारी व कर्मचा-यांच्या मृत्यूची आकडेवारी अशी – 

वर्ष        सर्कल        मृत्यू
२०१७-१८    अमरावती        १२
गडचिरोली        १५
नागपूर        १२
२०१६-१७    अमरावती        ०९
गडचिरोली        २३
चंद्रपूर        ०९
नागपूर        १२
यवतमाळ        ०५
२०१५-१६    अमरावती        ०९
यवतमाळ        १५
नागपूर        १०
चंद्रपूर        ०३
गडचिरोली        १५
२०१४-१५    अमरावती        २१
यवतमाळ        ०८
नागपूर        १६
चंद्रपूर        ००
गडचिरोली        २२
२०१२-१३    अमरावती        ०४
यवतमाळ        ०८
नागपूर        १०
चंद्रपूर        ०३
गडचिरोली        १९
२०१०-११    अमरावती        ०५
यवतमाळ        ०४
नागपूर        ११
चंद्रपूर        ०३
गडचिरोली        २३
२००९-१०    अमरावती        ०४
यवतमाळ        ०६
नागपूर        १०
उत्तर चंद्रपूर        ०६
दक्षिण चंद्रपूर    ११

Leave a comment

0.0/5