Skip to content Skip to footer

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

नागपूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या १७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परिक्षा घेण्यात येईल.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी लेखी परिक्षा १७ जुलैपासून ३० जुलैपर्यंत घेण्यात येईल. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून ३ऑगस्टपर्यंत घेण्यात येईल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) व्यवसाय अभ्यासक्रम पुरवणी लेखी परीक्षा १७ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत घेण्यात येईल. इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ९ जुलै १६ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.

दहावी पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्क भरून १४ जून ते २४ जून पर्यंत तर तर विलंब शुल्कासह २५ जून ते २७ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येईल. २८ जून ते १ जुलै या कालावधीत माध्यमिक शाळांना बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावे लागेल. तसेच शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या २ जुलै पर्यंत माध्यमिक शाळांना विभागीय मंडळाकडे सादर कराव्या लागतील. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखां मध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्ये पुणे डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5