Skip to content Skip to footer

‘मुळा’चे पाणी पाथर्डी-शेवगावच्या पूर्व-दक्षिणेला द्या

पाथर्डी : मुळा धरणाचे पाणी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागाला मिळावे, अशी मागणी जलक्रांती जनआंदोलन संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे संयोजक दत्ता बडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले.
शेवगावच्या पूर्व व दक्षिण भागात पाऊस कमी पडत असल्यामुळे यापूर्वी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून परिचित होता. कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी मुळा धरणाचे पाटपाणी कासारपिंपळगाव व साकेगावपर्यंत आले. परंतु ते पुढे आले न आल्यामुळे हा भाग पाण्याअभावी दुष्काळीच राहिला.

त्यामुळे पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून मोनिका राजळे यांनी या भागातील प्रत्येक गावात नवीन पाझर तलाव तयार करणे, असलेल्या पाझर तलावांची पुनर्बांधणी करून त्यांची साठवण क्षमता वाढवून त्यामध्ये मुळा धरणाचा पाट पुढे वाढवून शक्य तितक्या लवकर आवश्यक त्या ठिकाणी लिफ्ट उभारून पाईप चारीने पाणी सोडण्याची योजना तयार करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच येत्या बुधवारी यासाठी पाथर्डी तहसीलसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
तहसीलदारांना निवेदना देताना संजय दौंड, बाबासाहेब वाघ,अनिल जवरे, बाजीराव कीर्तने, अमोल कराड, अवि बडे, शुभम बडे, सुदर्शन बडे , रामनाथ बडे, शैलेंद्र जायभाये आदी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5