Skip to content Skip to footer

जोगेश्वरीच्या सोसायटीच्या आवारात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू

जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी परिसरातील तक्षशिला सोसायटीत दुर्दैवी घटना घडली आहे. काल वाहनचालक म्हणून काम करणारा इसम कार स्वच्छ करत होता. तक्षशिला सोसायटी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गुलमोहराचं झाड त्याच्या अंगावर कोसळलं. दरम्यान, त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत वाहनचालकाला हॉली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र, आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत इसमाचे नाव अनिल नामदेव घोसाळकर (४८) असं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाकडून १८ एप्रिलला सॊसायटी परिसरात पाहणी करून २२ एप्रिलला सोसायटीला पत्र पाठविण्यात आले. या पत्रात अतिरिक्त वाढलेल्या, झुकलेल्या आणि उन्मळून पडलेल्या, मृत झाडे आणि झाड्यांच्या फांद्यांच्या छाटणीबाबत सोसायटीला कळविण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अशी घटना घडल्याने पालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे.

Leave a comment

0.0/5