मुंबई : गणेशोत्सव काळात गर्दीचे विभाजन करण्यास विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने एकूण २२ फेºया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते थिविम, अहमदाबाद ते सावंतवाडी, अहमदाबाद ते थिविम, वडोदरा ते सावंतवाडी अशा फेºया चालविण्यात येतील. या गणपती मेल, एक्स्प्रेसचे तिकीट दर विशेष मेल, एक्स्प्रेसप्रमाणेच आकारण्यात येईल. येत्या १८ जूनपासून प्रवासी या मेल, एक्स्प्रेसचे आरक्षण करू शकतात.
गाडी क्रमांक ०९००७ मुंबई सेंट्रल ते थिविम विशेष मेल, एक्स्प्रेस २९ आॅगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री ११.५५ वाजता सुटेल. ती वसई रोडला मध्यरात्री १.१० वाजता पोहोचेल, तर थिविमला दुसºया दिवशी दुपारी ४ वाजता पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि मडुरे स्थानकांवर थांबा दिला जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
गाडी क्रमांक ०९४१६ अहमदाबाद ते सावंतवाडी विशेष मेल, एक्स्प्रेस २७ आॅगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी सकाळी ९.४० वाजता सुटेल. ती वसई रोडला दुपारी ४.१५ वाजता, तर सावंतवाडीला दुसºया दिवशी पहाटे साडेपाचला पोहोचेल. गाडी क्रमांक ०९४१८ अहमदाबाद ते थिविम विशेष मेल, एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी दुपारी ४.१५ मिनिटांनी सुटेल. ती वसई रोडला दुसºया दिवशी मध्यरात्री १ वाजता तर, थिविमला दुसºया दिवशी दुपारी ४ वा. पोहोचेल.
वडोदरा ते सावंतवाडी सुटणार रविवारी दुपारी
गाडी क्रमांक ०९१०६ वडोदरा ते सावंतवाडी विशेष मेल, एक्स्प्रेस १ ते ८ सप्टेंबर दरम्यान दर रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ही ट्रेन वसई रोडला रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी, तर सावंतवाडीला दुसºया दिवशी सकाळी ९.३० वा. पोहोचेल.