Skip to content Skip to footer

बारामती शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी उघड

शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी बारामती क्राईम ब्रँचसह ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत ४१ किलो गांजा आणि कारसह ८ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान स्वप्नील अहिवळे यांच्या गोपनीय माहितीवरुन हि कारवाई करण्यात आली. पोलीसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या  हद्दीत मारुती इटीर्गा (क्र टीएस २९, बी ९६९८)मध्ये  गांजा घेऊन बारामती मध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची   खात्रीशीर बातमी मिळाली

होती.त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसी मध्ये सापळा लावला होता.या कारवाईमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली.यामध्ये ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा सापडला आहे. या कारवाईमध्ये तेलंगणा राज्यातील पासिंग असलेली सुमारे ८ लाख रुपए किंमतीची कार देखील जप्त करण्यात आली आहे.

गांजा तस्करी प्रकरणी  आरोपी नविनकुमार पांडू जाटू,किसन सैदा नाईक लावरी,राकेश धर्मा लावरी (सर्व रा. हैद्राबाद),उमेश लक्ष्मण गायकवाड( रा.  बीड),अनिल राजू गायकवाड (रा तांदुळवाडी वेस बारामती)या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती क्राईम ब्रांचचे पोलीस जवान संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वनिल अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, तसेच पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे आदींनी सहभाग घेतला.

Leave a comment

0.0/5