काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात वाढलेल्या बेरोजगाराची संख्या पहा

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात वाढलेल्या बेरोजगाराची संख्या पहा….

आज काँग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्रात वाढत असलेल्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करतात खरंच त्यांच्या या वागण्यावर हसू येत आहे. आज भाजपाला बेरोजगार, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या या प्रश्नावर चालू सरकारला धारेवर धरणाऱ्या राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळातच सिंचन घोटाळा घडलेला होता. आज दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेताना आणि दुष्काळ दौरे करताना शरद पवार दिसत आहेत. पण शरद पवारांनी आपल्या सरकार मध्ये स्वतः जातीने लक्ष घालून अजित पवार यांच्याशी विचारपूस करून सिंचन विषयी लक्ष घातले असते तर सिंचन घोटाळा झाला नसता, आता आपण बेरोजगारीचा टक्का पाहू.

पक्षातील अंतर्गत कलहामुळे येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी टिकणार का ?

सेवायोजना कार्यालयात २०११ मध्ये २३ लाख बेरोजगारांनी नावनोंदणी केली होती, तर २०१२ मध्ये २५ लाख आणि २०१३ मध्ये २४ लाख बेरोजगारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण हे साडेसात लाखांपेक्षा अधिक झालेले दिसून येते. या कार्यकाळातं राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता होती. यासाठी शासकीय पातळीवर दरवर्षी अवघ्या दीडशे मेळावे घेतले गेले होते. या मेळाव्यांमधून मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाणही अत्यल्प असून त्यातही, मराठी तरुणांना नेमक्या किती नोकऱ्या मिळाल्या, याची माहिती तात्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दिलेली नाही आहे.

शासकीय भाषेत भूमिपुत्र म्हटल्या जाणाऱ्या मराठी बेरोजगारांची संख्या वेगाने वाढत असतानाही राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार मात्र शांत होती. एकीकडे परप्रांतीयांचे लोंढे शहरांमध्ये येऊन सर्व प्रकारचे रोजगार मिळवत असताना, राज्याच्या सेवायोजना कार्यालयातील मराठी बेरोजगारांची वाढती आकडेवारी डोळे विस्फारणारी होती. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार त्यावर काहीही उपाय योजना करू शकले नाही. व आज पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वतः अपयशी ठरलेल्या विषयाला हातात घेऊन भाजपाला अडचणीत आणण्याचे काम करताना दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here