. जिल्हा बॅँक व विकास संस्थांनी स्वभांडवलातून वाटप केलेले ‘खावटी’ कर्ज आता माफ होणार आहे. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत याचा समावेश केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे
राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला; पण त्याच्या निकषात अनेक शेतकरी अडकले आहेत. यामध्ये ‘खावटी’ कर्ज उचल केलेले शेतकरीही अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्याशिवाय इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते; यासाठी जिल्हा बॅँक व विकास संस्थांकडून कर्जाचे वाटप केले जाते.
विकास संस्था स्वभांडवलातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. हे थकीत कर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती; पण निकषात बसत नसल्याने हजारो शेतकरी वंचित राहिले होते. याबाबत अखिल भारतीय किसान कॉँग्रेसने निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारने थकीत खावटी कर्ज माफीचा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे.