सिने अभिनेत्री केतकी चितळे यांच्या फेसबुक पेजवर काही दिवसापूर्वी अश्लीश भाषा वापरून त्यांना ट्रॉल करण्यात आलेले होते. अशी अश्लिश भाषा वापरणाऱ्या फेसबुक युजरला केतकी चितळे यांनी साडेतोड उत्तर सुद्धा दिले होते. अशा पद्धतीने अश्लील भाषेत बोलणारा महाराष्ट्र माझा नाहीय अशा शब्दांत तिच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेतला होता. मराठी अस्मितेच्या नावावर केतकीला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्याांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे असे वक्तव्य सुद्धा शिवसेना आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी केले होते.
सोशल मीडियावर मते पटत नसल्यामुळे अगदी खालच्या पातळीवर जाऊन विरोध केला जात आहे. हे करताना संयम, विवेक, सुसंस्कृतता यासोबतच कायदेशीर जबाबदारीचे भान अनेकवेळा सुटलेले दिसत आहे. अश्लील शिव्या, अगदी बलात्काराची भाषा वापरली जात आहे. व्यक्तीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, याकडे गोर्हे यांनी लक्ष वेधले. आयटी कलम 66 (अ) सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे अश्लील भाषेत ट्रोलिंग करणार्या मवाली लोकांचे फावले आहे. त्यामुळे आयटी कायद्यात महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कायदा तयार करता येईल का, याबाबत माहिती घ्यावी असे गोर्हे म्हणाल्या.