गोंदिया : दरवर्षी शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठीे व भविष्यातील शाश्वत नियोजनासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन शासकीय इमारतींसह २०० चौरस मीटर पेक्षा जास्त आर.सी.सी.संरचना असलेले बांधकाम अथवा विद्यमान बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग लावण्याचे नगर परिषदेने बंधनकारक केले आले आहे.
जमिनीतील पाण्याचा स्तर वाढवून भविष्यातील निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी व जमिनीतील पाणी साठा वाढेल यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोणत्याच शासकीय इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लावण्यात आलेले नाही. जर सर्व शासकीय इमारतींमध्ये हे सिस्टीम लावण्यात आले तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात व्यर्थ जाणारे पाणी जमा होऊन जमिनीपर्यंत पोहचिवल्या जाईल.
जिल्ह्यात जवळपास ११०० ते १३०० मिमी पाऊस होतो. जर सर्व शासकीय इमारती व दोन मजली इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लावण्यात आले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी गोळा करुन जमिनीतील स्त्रोतांपर्यंत पोहचविल्या जाऊ शकते.