औरंगाबाद : चार मित्र दोन दुचाकीने विद्यापीठात जात असताना समोरील वाहनाने अचानक वेग कमी केल्याने जोरदार ब्रेक लावल्यानंतर दुचाकी उलटून झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोखंडी पुल ते महावीर चौकदरम्यान घडला.या अपघाताची नोंद छावणी ठाण्यात करण्यात आली
उर्वेश सुभाष जुमडे (रा.राजमाता जिजाऊ नगर, मुकुंदवाडी परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, उर्वेश आणि त्याचा मित्र जयेश नरवडे (वय १६,रा. जयभवानीनगर), प्रतीक सुनील आठवले(रा. सिडको एन-४) आणि आकाश उद्धव सोनार (वय १६,रा.जयभवानीनगर) हे सिडको एन-३ मधील सेंट मीरा इंग्लीश स्कुलमध्ये दहावीचे विद्यार्थी आहेत. आज सकाळी उर्वेश आणि जयेश एका दुचाकीने तर प्रतिक आणि आकाश हे दुसऱ्या मोटारसायकलने नाश्ता करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलवर जात होते.