Skip to content Skip to footer

धक्कादायक! वडाळ्यात चिमुकलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसाला अटक

मुंबई – शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने आपल्या घरात बोलावून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. संजय वाघमोडे (३५) असं अटक पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

ताडदेव येथे एलए – ३ विभागात वाघमोडे कार्यरत आहे. वडाळा येथील इंदिरा नगर परिसरात राहणाऱ्या संजयने तीन दिवसांपूर्वी घरात कोणी नसताना शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. मुलगी घरात जाताच संजयने तिच्याशी अश्लील कृत्य केले.

घडलेला प्रकार मुलीने तिच्या मोठ्या भावाला सांगितला. भावाने घडलेला अश्लील प्रकार आईला सांगितल्यानंतर पालकांनी वडाळा पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करून संजय वाघमोडेला अटक केली. संजयने याआधी देखील एका महिलेचा विनयभंग केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5