Skip to content Skip to footer

दुष्काळ भागातील विध्यार्थीसाठी एसटीचा मोफत पास….

राज्यात पडलेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांकडे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच प्रवास करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या शिक्षणामध्ये बाधा येऊ नये म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळ भागातील विध्यार्थ्यांसाठी मोफत पासची योजना राबवली होती. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत दिलेल्या मोफत प्रवास सवलतीचा लाभ २० लाख ७८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला. अशी माहिती रावते यांनी दिलेली होती.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ३३.३३% शैक्षणिक शुल्काची रक्कम माफ करण्यात आली. राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने परिवहन महामंडळाकडे दुष्काळग्रस्त ९ जिल्ह्यांमध्ये एसटीकडून पाणीपुरवठा करण्यात आला. एसटी महामंडळाच्या अखत्यारितील विहिरी त्यासाठी खुल्या करण्यात आल्या, अशी माहिती रावते यांनी निवेदनाद्वारे दिली. दुष्काळी भागातील संभाजी नगर, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांमध्ये रिक्त चालक तथा वाहकपदाची सरळसेवेने भरती करण्याबाबातचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a comment

0.0/5