Skip to content Skip to footer

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव करणार, आढळरावांचा निर्धार

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव करणार, आढळरावांचा निर्धार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खादारकीचा “चौकार” मारण्यास अपयशी ठरलेले शिवाजीराव आढळराव पाटील पराभवानंतर शिवसेना संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांना शिवसेना वर्धापनदिनी शिवसेना उपनेते पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना आढळरावांनी “आंबेगाव, जुन्नर आणि राजगुरूनगर मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकणार” असा निर्धार व्यक्त केला होता.

आज नारोडी आणि गावडेवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा विजय झाल्यानंतर आढळरावांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर “बदल हवा..आता आमदार नवा” अशी पोस्ट करत “आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा बुरुज ढासळण्यास आजपासून सुरुवात” असं म्हटलं आहे. यानिमित्ताने आंबेगाव मतदारसंघावर भगवा फडकवण्याचा पुनरूच्चार त्यांनी केला आहे.

गेली १५ वर्षे शिरूर मतदारसंघात खासदार म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव पत्करावा लागला होता. यात आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीला लीड असल्याने पराभव जिव्हारी लागलेल्या आढळरावांनी आता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला उध्वस्त करून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे.

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ?

Leave a comment

0.0/5