Skip to content Skip to footer

नागपुरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट; नागरिकांची गैरसोय

नागपूर: बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे असलेल्या एटीएमच्या शोधात नागरिकांना चार ते पाच कि.मी. चे अंतर कापावे लागत आहे.

मानेवाडा रोड
तुकडोजी चौक ते मानेवाडा चौक दरम्यानच्या मार्गावर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बाजूलाच या बँकेचे एटीएम आहे. परंतु या एटीएममध्ये अनेकदा रक्कम नसल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या एटीएमधारकांना निराश होऊ न परतावे लागते. रविवारी या एटीएममध्ये रक्कम नसल्याने एटीएमधारकांना पैसे काढता आले नाही. या परिसरात बँक ऑफ इंडियाचे एकमेव एटीएम असूनही या एटीएममध्ये पैसेच नसतात. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात, अशी माहिती एटीएमधारकांनी दिली.

नागपूर नागरिक सहकारी बँके च्या मानेवाडा रोडवर नागपूर नागरिक सहकारी बँक लि.ची शाखा आहे. शाखेच्या बाजूलाच बँकेचे एटीएम आहे. बँकेच्या खातेधारकांना सुविधा व्हावी, यासाठी एटीएम सुरू करण्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला होता.मात्र या एटीएममध्ये नेहमीच पैशाचा ठणठणाट असतो. रविवारी बँक बंद असल्याने अनेक एटीएमधारक पैसे काढण्यासाठी आले होते. परंतु पैसे नसल्याने एटीएम बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावर एटीएमधारकांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5